Posts

Showing posts from May, 2017

*टायटल...* सुचले नाही म्हणून... थेट वाचा.

     बायकोच्या जाचाला कंटाळून नव-याने केली आत्महत्या. गर्लफ्रेंड ने फसवल्यामूळे तरूणाने केला आत्महत्येचा प्रयत्न. सासूच्या ञासाला बळी पडलेल्या विवाहीतेचा खून. सूनेच्या छळामूळे अनेक वृद्धाश्रमात गर्दी. मुलीच्या हट्टी आणि बेफिकीर वागण्यामुळे पालक ञस्त. अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. भलेही त्यांचे प्रमाण कमी असोत, पण या गोष्टी समाजात दिसून येतात हे खरयं.      स्ञिया त्यांच्या जन्मापासूनच कमीपणाचे ओझे घेऊन जगत असतात. त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आधी जन्मासाठी धडपड मग जगण्यासाठीची धडपड. स्ञी म्हटले की वेदना, परावलंब, हुकूमशाहीची बळी हे मनात येते. याला फाटा फोडणारा अनेक स्ञिया इतिहासात होऊन गेल्या व आजही धडत आहेत.      अनेकदा 'स्ञी' आहे म्हणून sympathy ही मिळते.स्ञी-पुरूष संबंधी एखादी घटना घडली तर नेहमी soft corner स्ञीला मिळतो. आजकाल अनेक कायदे स्ञीयांच्याच बाजूने आहेत.(हे कायदे गरजेचेच आहेत). या कायद्यांचा गैरवापरही होतो.      स्ञी म्हटले की शोषित आणि पुरूष म्हटले की शोषक हे लेबल लावणे योग...