स्तनदायिनी
माझ्या चुलत्या डोंगर दऱ्यात राहायच्या. "बाळा, हा घे तुला खाऊ" असं त्यांनी मला कधी म्हंटलच नाही. यशोदेला आठवत नाही की तिच्या चुलत्या मायाळू होत्या की दुष्ट. जसं की तिला हे ही आठवत नाही की ती कंगालीचरणची बायको आहे, वीस जिवंत - मृत मुलांची आई आहे... तिच्या बोटांवर मोजली होती तिने. तिची कूस कधी रिकामी राहिली असेल हे देखील तिला आठवत नाही. कोण्या सकाळी तिला भोवळ आली नाही किंवा कंगालीच्या शररीराने एका भूगर्भशास्ञज्ञाप्रमाणे तिच्या शरीराचे उत्खनन केले नाही, असे कधी झालेच नाही. ती बाळाला जन्म देऊ शकते की नाही हा विचार करण्यासाठी सुद्धा तिला वेळ नव्हता. आईपण हे तिच्या जगण्याची पद्धत होऊन बसलं. यशोदा ही व्यावसायिक आई होती. ती मालकांच्या घरातल्या लेकीबाळींसारखी हौशी आई नव्हती. हे जग व्यावसायिकांचे आहे. इथे हौशी भिकारी,पाकिटमार यांना जागा नाही. अगदी भटका कुञा किंवा कचऱ्यावर जगणारी गाय असो... तिच्या हौसेला मोल नाही. यशोदाने मातृत्वाला तिचा व्यवसाय बनवला. कंगाली एका हलवाईच्या दुकानात मिठाई बनवायचा व शुद्ध ब्राह्मणाने बनवलेले अन्न याञींना विकायचा. दुर्गादेवी...