संविधानात प्रस्तुत केलेल्या स्वातंञ्याचा आधार घेऊन आम्ही आमच्या घरी आमच्या इच्छेखातर बाय चॉईस गणपती बसवतो. गणपती बसवल्यावर पुजा आर्चा, सत्यनारायण ही करावा, त्यामुळे घरात सुख शांती नांदते. पुजेसाठी आम्हाला भट लागतो. ज्या व्यवस्थेने आम्हांला माणसा सारखी वागणूक दिली नाही, आमचे अस्तित्वच नाकारले त्या व्यवस्थेला मूठमाती देण्यापेक्षा ती व्यवस्था शाबूत ठेवण्यात आमचा खारीचा वाटा आहे. प्रबोधनाचा उत्तम मार्ग असताना, हिंसा व बहिष्कृत करण्याची भाषा वापरणारे आम्ही धम्माचे उपासक आहोत. आम्ही धर्म बदलला पण कर्मकांड सोडले नाहीत. नावे वेगळी, प्रथा वेगळ्या परंतु व्यवस्था तीच निर्माण करतोय. आमच्याकडेही आम्ही "दलाल" आणलेत. आम्ही तर्कवादी व पुरोगामी धम्माचे आचरण करत आहोत. - सजग
Posts
Showing posts from 2017
दहा दिवसांचा पाहुणा......
- Get link
- X
- Other Apps
दहा-बारा दिवसांपुर्वी मी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळी माघारी आले तर "तो" आला होता....नेहमीप्रमाणेच, या वर्षी जरा वेगळाच होता. तो आलाय सॉरी आणला गेलाय हे त्याच्या आवाजावरून समजले. मला रोज दिसायचा तो. त्याचा आवाज तर सतत कानावर पडत होता. यावर्षीचा जरा जास्तच ओरडत होता. माणसांची वर्दळ असेल नेहमी त्याच्याभोवती बहूतेक आणि इकडे तो एकलकोंडा झाला होता, म्हणून ओरडायचा....सारखाच. त्याला शांत करायला, त्याच्याशी बोलायला,त्याला भरपेट खाऊ घालायला,त्याला फिरायला घेऊन जायला माणसे होती. तरीही बिचारा एकटाच होता. त्याच्या सततच्या ओरडण्यामूळे त्याचे अस्तित्व जाणून यायचे. दहा दिवस कसे गेले कळालेच नाही. त्याला पाहण्याची, त्याच्या आवाजाची सवय होऊन गेली होती. काल त्याला पाहीले तेव्हा तो मस्तपैकी त्याच्या नादात होता. एकदम बिनधास्त. मी खूप वेळ निरखत होते त्याला. उद्याची सकाळ येवूच नये असे वाटत होते. आज ही मी खूप लवकर उठले, जाग आली अचानकच. उठल्या उठल्या पहिलं त्याला पाहण्यासाठी गेले तर तो मस्त रवंथ करत होता. माझे आवरून मी अ...
*टायटल...* सुचले नाही म्हणून... थेट वाचा.
- Get link
- X
- Other Apps
बायकोच्या जाचाला कंटाळून नव-याने केली आत्महत्या. गर्लफ्रेंड ने फसवल्यामूळे तरूणाने केला आत्महत्येचा प्रयत्न. सासूच्या ञासाला बळी पडलेल्या विवाहीतेचा खून. सूनेच्या छळामूळे अनेक वृद्धाश्रमात गर्दी. मुलीच्या हट्टी आणि बेफिकीर वागण्यामुळे पालक ञस्त. अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. भलेही त्यांचे प्रमाण कमी असोत, पण या गोष्टी समाजात दिसून येतात हे खरयं. स्ञिया त्यांच्या जन्मापासूनच कमीपणाचे ओझे घेऊन जगत असतात. त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आधी जन्मासाठी धडपड मग जगण्यासाठीची धडपड. स्ञी म्हटले की वेदना, परावलंब, हुकूमशाहीची बळी हे मनात येते. याला फाटा फोडणारा अनेक स्ञिया इतिहासात होऊन गेल्या व आजही धडत आहेत. अनेकदा 'स्ञी' आहे म्हणून sympathy ही मिळते.स्ञी-पुरूष संबंधी एखादी घटना घडली तर नेहमी soft corner स्ञीला मिळतो. आजकाल अनेक कायदे स्ञीयांच्याच बाजूने आहेत.(हे कायदे गरजेचेच आहेत). या कायद्यांचा गैरवापरही होतो. स्ञी म्हटले की शोषित आणि पुरूष म्हटले की शोषक हे लेबल लावणे योग...
बेगम जान
- Get link
- X
- Other Apps
एक महिन्यापुर्वी एक जबरदस्त ट्रेलर पाहीला. विद्या बालन माझी सगळ्यात आवडती अभिनेञी, तिच्या नंतर स्मिता पाटील यांचा नंबर. त्यामूळे बेगम जानची उत्सुकता फार लागली होती. अखेर काल हा चिञपट पाहीलाच.डोकं सुन्न झालं होतं, अनेक प्रश्नांनी मनात थैमान घातले होते. विद्याचा अप्रतिम अभिनय सोबत चपराक संवाद असा हा चिञपट मला खूप आवडला. वेश्या व्यवसाय करणारा व्यवसायिक महीलांची ही कहाणी. बेगम जान त्यांची मुखिया. Radcliffe च्या "Partition Line" मूळे त्यांना त्यांचा कोठा सोडावा लागणार होता. पण या बायकांना हे मंजूर नव्हते. त्या लढल्या, पडल्या, कोसळल्या,रडल्या,भाजल्या,मेल्या... पण हारल्या नाहीत. *"Lived as whores, fought as Queens"* बेगम जानच्या कोठ्यात येणारी प्रत्येक मुलगी अनेक कडू आठवणी सोबत घेऊन आली. स्वत: बेगम जान ही बाल विधवा होती. कोणी बलात्कार पिढीत तर कोणी फाळणीची बळी. पुर्वआयुष्यातील ओरखडे विसरून या महीला बिनधास्त आयुष्य जगत होत्या. ना कशाची भिती ना इज्जतीची काळजी. त्यातील एकीला एक पुरूष आवडला होता तर एका पुरुषाला त्यातील एक आवडली होती. लेसबीयन्सची जोडी ही होती त...
नात्यातील कोडी उलगडताना.....
- Get link
- X
- Other Apps
माणूस हा नात्यांमध्ये गुरफटलेला सामाजिक प्राणी. नाती किती महत्वाची असतात ना? विविध नात्यांचं मोलाचं स्थान असते आपल्या आयुष्यात. आई, बाबा, आजी, आजोबा, काका ,मामा, मावशी, आत्या हि नाती जन्मानेच मिळतात. पण मैत्रीचं नातं बनवावे लागते. हीच या नात्याची खासियत आहे. मैत्री म्हणजे निखळ आनंद. कधीही, कोठेही, कोणाशीही, कशीही मैत्री होते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसहित स्वीकारणे म्हणजे मैत्री. ज्यात कसलेही बंधन नाही ती झाली मै त्री. "तू जैसी भी है, तू मेरी दोस्त है" हे असे काहीसे असते यात. रखरखत्या उन्हात मंद हवेची हळुवार झुळूकच जणू. मैत्री बरेच काही शिकवते, अनेक अनुभव देते. या सुंदर नात्यातील वीण उसवायला लागली तर............ या सारखा दुसरा कुठला आघात नाही.गैरसमज,अबोला, संवादाची कमतरता, नवीन लोकांचा समावेश, जुन्या लोकांची घुसखोरी,वैचारिक मतभेद,वैयक्तिक मतभेद,ताण तणाव, इ. करणे जबाबदार असू शकतात या आघातासाठी.खरं कारण कुठले हे आपले आपण शोध...
श्वेता......एक अधूर पान
- Get link
- X
- Other Apps
प्रिय श्वेता, काय झालं गं हे सगळं ? कुठं गेलीस तू ? मी कल्पनाही करू शकत नाहीये तुझ्या जाण्याची. रात्रभर झोप लागली नाही गं काल. सतत तू आणि तुझ्या गोंडस पऱ्या प्राप्ती आणि शुभ्रा डोळ्यांसमोर येत होत्या. तू खूप सुंदर होतीस हा काय गुन्हा होता तुझा ? लहान वयात लग्न झाले तुझे ते ही तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी. परिस्थितीने हे करायला भाग पाडलं ना गं तुला ? तुला आठवतंय का तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मी तुला नटवले होते. तुझ्या मृत देहावर हार आणि फुलं पडताना मी नाही गं पाहू शकत. ए श्वेता, ऐकतेस ना गं ? खूप वेदना सहन केल्या ना गं तू ? तुझ्या मखमली देहावर निर्घृण वार करताना काहीच कसे नाही वाटले गं त्याला ? नवरा होता ना तो तुझा ? तुझ्या दोन मुलींचा बाप होता ना ? मग असा का वागला तो ? संशयीवृत्तीने पुरुषी अहंकार उफाळून आला त्याचा. मानसिक संतुलन घालवून बसला आणि विकृतीकडे झुकला. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच असं क्रूरतेने कसं काय मारलं त्याने ? ए श्वेता, बोल ना गं, तुझी तक्रार म...
दशकपूर्ती निमित्ताने.....
- Get link
- X
- Other Apps
मला taboo विषयांवर बोलायला खूप आवडते. विद्रोहाची सवयच लागलीये जणू. आता तुम्ही दशकपूर्ती नेमकी कशाची झाली याचा विचार करत असाल ना? माझ्या आजीच्या भाषेत सांगायचं झालं तर, “मी शहाणी झाले किंवा मला पहिल्यांदा कावळा शिवला.” याला तब्बल दहा वर्षं पूर्ण झालीत आणि अकराव्या वर्षांत पदार्पण केलंय मी. बऱ्याच दिवसांपासून या अतिशय संवेदशील पण तितक्याच हलक्या-फुलक्या विषयावर लिहायचं होतं. आज पेन हातात घेतला. मला अजूनही तो दिवस आठवतो. मी माझ्या बाबांसोबत शाळेत पाचवी इयत्तेमध्ये प्रवेश घ्यायला निघाले होते आणि तेवढयात ही गोष्ट कपडे धुताना आमच्या कामवालीच्या लक्षात आली. आई नोकरीवर गेलेली. घरात होत्या फक्त माझी आजी आणि मावसबहीण रूपाताई. ताईने मला विचारले, “तुझ्या पोटात दुखतंय का?” नक्की झालंय काय? मला काहीच कळत नव्हते नक्की झालय काय. किती लहान वय ते... खेळण्या-बागडण्याचं. पण ह्या एका घटनेने आयुष्यच बदलून गेलं. मासिक पाळीचा अर्थही कळत नव्हता. परंतु दर महिन्याला मला काहीतरी होतंय याचा न्यूनगंड मनात छळ माजवत होता. त्यावेळी त्या पार्वतीची गोष्ट ऐकल्यावर मला तिचा खूप रा...