Posts

Dalit Feminism

  “Who, just tell me, who the hell is that new girl? Doesn’t she know that she has to bow down to the master? Shameless bitch! How dare she pass me without showing due respect? At this the girl’s in-laws and other elderly men from community falls at the man’s feet and beg for mercy. They request him to forgive her. But they ask for forgiveness not for the girl but for themselves also. The mother-in-law requests, “No, no kind master! That girl is a new animal in the herd! Quite foolish and ignorant. If she has erred, I her sasra, fall at your feet, but please forgive us for this crime.” -           ‘The Prison We Broke’ by Babytai Kamble Woman….a creature that is exploited, ill-treated, less valued   and oppressed since centuries and centuries. Literature is a mirror image of society. So, she didn’t even get correctly placed there. After realizing the patriarchal tyranny a feminist movement emerged gradually who talked about w...

स्तनदायिनी

    माझ्या चुलत्या डोंगर दऱ्यात राहायच्या. "बाळा, हा घे तुला खाऊ" असं त्यांनी मला कधी म्हंटलच नाही.     यशोदेला आठवत नाही की तिच्या चुलत्या मायाळू होत्या की दुष्ट. जसं की तिला हे ही आठवत नाही की ती कंगालीचरणची बायको आहे, वीस जिवंत - मृत मुलांची आई आहे... तिच्या बोटांवर मोजली होती तिने. तिची कूस कधी रिकामी राहिली असेल हे देखील तिला आठवत नाही. कोण्या सकाळी तिला भोवळ आली नाही किंवा कंगालीच्या शररीराने एका भूगर्भशास्ञज्ञाप्रमाणे तिच्या शरीराचे उत्खनन केले नाही, असे कधी झालेच नाही. ती बाळाला जन्म देऊ शकते की नाही हा विचार करण्यासाठी सुद्धा तिला वेळ नव्हता. आईपण हे तिच्या जगण्याची पद्धत होऊन बसलं. यशोदा ही व्यावसायिक आई होती. ती मालकांच्या घरातल्या लेकीबाळींसारखी हौशी आई नव्हती. हे जग व्यावसायिकांचे आहे. इथे हौशी भिकारी,पाकिटमार यांना जागा नाही. अगदी भटका कुञा किंवा कचऱ्यावर जगणारी गाय असो... तिच्या हौसेला मोल नाही. यशोदाने मातृत्वाला तिचा व्यवसाय बनवला.     कंगाली एका हलवाईच्या दुकानात मिठाई बनवायचा व शुद्ध ब्राह्मणाने बनवलेले अन्न याञींना विकायचा. दुर्गादेवी...

हातभर बाही, मानेपर्यत कॉलर गळा, ञिकोणी ओढणी....युनिफॉर्म

मी कोणत्याही कॉलेजला असले की त्याच्या शेवटच्या वर्षी यूनिफॉर्म होतोच. Bad luck वगैरे म्हणणार नाही कारण नशीबावर आपला विश्वासच नाही. परवा अचानक मला समजले की आमच्यासाठी कॉलेजने यूनिफॉर्म केलाय. चार वर्ष काढली या कॉलेज मध्ये, आता हे शेवटचे वर्ष आणि नेमका आत्ताच यूनिफॉर्म व्हावा! जरा नाखूष होते. पण असो, कॉजेलाही काही प्रोटोकॉल्स पाळावे लागतात म्हणून घेतला असेल हा निर्णय. तो मान्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे ही विद्यार्थी म्हणून आमची जबाबदारी आहे.      यूनिफॉर्म चा फोटो पाहीला आणि......... शब्दच सुचले नाहीत. एक ठिणगी पडावी व मनात विचारांचा वणवा पेटावा असं झालं काहीसं. हातभर बाही, मानेपर्यत कॉलर गळा आणि ञिकोणी ओढणी. रंग वगैरे भाग नंतरचा, त्याचा फार विचार करत नाही मी. पण हा असा ड्रेस आपण रोज घालायचा? का? बाही हातभरच का? कशासाठी? थंडी लागते म्हणून? कॉलर व ते ही पुर्ण बंदिस्त गळा. का? चुकून खाली वाकलो तर काही दिसू नये म्हणून? ञिकोणी ओढणी. का? कशासाठी? असं काय आणि का झाकून ठेवायचय? ओढणीने झाकलेच पाहिजे का? बरं एवढं सगळं घालूनही नजरेने होणारे बलात्कार थांबतील का???     ...

त्यांच येणं.....

     त्याचा पुसटसा आवाज माझ्या कानांवर पडला. मला वाटलं त्याने हाक मारली असावी किंवा शीळ घातली असेल कदाचित. कानोसा घेत मी दार उघडले. तो आला.... सैरभैर होऊ लागला. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती, रागवला होता बहुतेक. हल्ली वेळ कोठे असतो माझ्याकडे त्याला भेटायला. पण त्याचं असं येणं मला आवडले होते. मन अलगत आतून सुखावले होते. त्याचा प्रत्येक स्पर्श मला खेळवून ठेवत होता. त्याचे अस्तित्व मला जाणवत होते अगदी पापणीचा केस हळूवारपणे घसरत गालावर येवून रेंगाळतो तसेच.      त्याला माझ्या केसांशी खेळायला फार आवडते. हलकेच बटांना तो छेडत असतो. कधी डोळ्यांवर तर कधी गालांवर, कधी कपाळावर तर कधी ओठांवर.... त्याचे ते रोमांचित स्पर्श मला भासत होते. मी माञ डोळे बंद करून होते. त्या अनुभवालाच जगत होते. पुढे या अनुभवाची आठवण होईल आणि ती मला कायम जिवंत ठेवायची आहे. आठवणींशिवाय जगणं म्हणजे आयुष्याशी बेईमानी आहे. तो सोबत असताना माझे डोळे नेहमी बंदच ठेवते मी, उघडले तर गालांवर खारट पाण्याचे टपोरे थेंब बैठक भरवतात. त्याला असाच अनुभवायला आवडते मला आणि कायम आवडत राहिल.      मला...
    संविधानात प्रस्तुत केलेल्या स्वातंञ्याचा आधार घेऊन आम्ही आमच्या घरी आमच्या इच्छेखातर बाय चॉईस गणपती बसवतो. गणपती बसवल्यावर पुजा आर्चा, सत्यनारायण ही करावा, त्यामुळे घरात सुख शांती नांदते. पुजेसाठी आम्हाला भट लागतो. ज्या व्यवस्थेने आम्हांला माणसा सारखी वागणूक दिली नाही, आमचे अस्तित्वच नाकारले त्या व्यवस्थेला मूठमाती देण्यापेक्षा ती व्यवस्था शाबूत ठेवण्यात आमचा खारीचा वाटा आहे.     प्रबोधनाचा उत्तम मार्ग असताना, हिंसा व बहिष्कृत करण्याची भाषा वापरणारे आम्ही धम्माचे उपासक आहोत.    आम्ही धर्म बदलला पण कर्मकांड सोडले नाहीत. नावे वेगळी, प्रथा वेगळ्या परंतु व्यवस्था तीच निर्माण करतोय. आमच्याकडेही आम्ही "दलाल" आणलेत.     आम्ही तर्कवादी व पुरोगामी धम्माचे आचरण करत आहोत.                                           - सजग 

दहा दिवसांचा पाहुणा......

    दहा-बारा दिवसांपुर्वी मी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळी माघारी आले तर "तो" आला होता....नेहमीप्रमाणेच, या वर्षी जरा वेगळाच होता. तो आलाय सॉरी आणला गेलाय हे त्याच्या आवाजावरून समजले.     मला रोज दिसायचा तो. त्याचा आवाज तर सतत कानावर पडत होता. यावर्षीचा जरा जास्तच ओरडत होता. माणसांची वर्दळ असेल नेहमी त्याच्याभोवती बहूतेक आणि इकडे तो एकलकोंडा झाला होता, म्हणून ओरडायचा....सारखाच.     त्याला शांत करायला, त्याच्याशी बोलायला,त्याला भरपेट खाऊ घालायला,त्याला फिरायला घेऊन जायला माणसे होती. तरीही बिचारा एकटाच होता. त्याच्या सततच्या ओरडण्यामूळे त्याचे अस्तित्व जाणून यायचे. दहा दिवस कसे गेले कळालेच नाही. त्याला पाहण्याची, त्याच्या आवाजाची सवय होऊन गेली होती.     काल त्याला पाहीले तेव्हा तो मस्तपैकी त्याच्या नादात होता. एकदम बिनधास्त. मी खूप वेळ निरखत होते त्याला. उद्याची सकाळ येवूच नये असे वाटत होते. आज ही मी खूप लवकर उठले, जाग आली अचानकच. उठल्या उठल्या पहिलं त्याला पाहण्यासाठी गेले तर तो मस्त रवंथ करत होता.     माझे आवरून मी अ...

*टायटल...* सुचले नाही म्हणून... थेट वाचा.

     बायकोच्या जाचाला कंटाळून नव-याने केली आत्महत्या. गर्लफ्रेंड ने फसवल्यामूळे तरूणाने केला आत्महत्येचा प्रयत्न. सासूच्या ञासाला बळी पडलेल्या विवाहीतेचा खून. सूनेच्या छळामूळे अनेक वृद्धाश्रमात गर्दी. मुलीच्या हट्टी आणि बेफिकीर वागण्यामुळे पालक ञस्त. अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. भलेही त्यांचे प्रमाण कमी असोत, पण या गोष्टी समाजात दिसून येतात हे खरयं.      स्ञिया त्यांच्या जन्मापासूनच कमीपणाचे ओझे घेऊन जगत असतात. त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आधी जन्मासाठी धडपड मग जगण्यासाठीची धडपड. स्ञी म्हटले की वेदना, परावलंब, हुकूमशाहीची बळी हे मनात येते. याला फाटा फोडणारा अनेक स्ञिया इतिहासात होऊन गेल्या व आजही धडत आहेत.      अनेकदा 'स्ञी' आहे म्हणून sympathy ही मिळते.स्ञी-पुरूष संबंधी एखादी घटना घडली तर नेहमी soft corner स्ञीला मिळतो. आजकाल अनेक कायदे स्ञीयांच्याच बाजूने आहेत.(हे कायदे गरजेचेच आहेत). या कायद्यांचा गैरवापरही होतो.      स्ञी म्हटले की शोषित आणि पुरूष म्हटले की शोषक हे लेबल लावणे योग...