Posts

Showing posts from January, 2017

नात्यातील कोडी उलगडताना.....

              माणूस हा नात्यांमध्ये गुरफटलेला सामाजिक प्राणी. नाती किती महत्वाची असतात ना? विविध नात्यांचं मोलाचं स्थान असते आपल्या आयुष्यात. आई, बाबा, आजी, आजोबा, काका ,मामा, मावशी, आत्या हि नाती जन्मानेच मिळतात. पण मैत्रीचं नातं बनवावे लागते. हीच या नात्याची खासियत आहे.              मैत्री म्हणजे निखळ आनंद. कधीही, कोठेही, कोणाशीही, कशीही मैत्री होते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसहित स्वीकारणे म्हणजे मैत्री. ज्यात कसलेही बंधन नाही ती झाली मै त्री. "तू जैसी भी है, तू मेरी दोस्त है" हे असे काहीसे असते यात. रखरखत्या उन्हात मंद हवेची हळुवार झुळूकच जणू. मैत्री बरेच काही शिकवते, अनेक अनुभव देते. या सुंदर नात्यातील वीण उसवायला लागली तर............              या सारखा दुसरा कुठला आघात नाही.गैरसमज,अबोला, संवादाची कमतरता, नवीन लोकांचा समावेश, जुन्या लोकांची घुसखोरी,वैचारिक मतभेद,वैयक्तिक मतभेद,ताण तणाव, इ. करणे जबाबदार असू शकतात या आघातासाठी.खरं कारण कुठले हे आपले आपण शोध...

श्वेता......एक अधूर पान

Image
प्रिय श्वेता,                           काय झालं गं हे सगळं ? कुठं गेलीस तू ? मी कल्पनाही करू शकत नाहीये तुझ्या जाण्याची. रात्रभर झोप लागली नाही गं काल. सतत तू आणि तुझ्या गोंडस पऱ्या प्राप्ती आणि शुभ्रा डोळ्यांसमोर येत होत्या. तू खूप सुंदर होतीस हा काय गुन्हा होता तुझा ? लहान वयात लग्न झाले तुझे ते ही तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी. परिस्थितीने हे करायला भाग पाडलं ना गं तुला ? तुला आठवतंय का तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मी तुला नटवले होते. तुझ्या मृत देहावर हार आणि फुलं पडताना मी नाही गं पाहू शकत. ए श्वेता, ऐकतेस ना गं ? खूप वेदना सहन केल्या ना गं तू ? तुझ्या मखमली देहावर निर्घृण वार करताना काहीच कसे नाही वाटले गं त्याला ? नवरा होता ना तो तुझा ? तुझ्या दोन मुलींचा बाप होता ना ? मग असा का वागला तो ? संशयीवृत्तीने पुरुषी अहंकार उफाळून आला त्याचा. मानसिक संतुलन घालवून बसला आणि विकृतीकडे झुकला. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच असं क्रूरतेने कसं काय मारलं त्याने ? ए श्वेता, बोल ना गं, तुझी तक्रार म...

दशकपूर्ती निमित्ताने.....

          मला taboo विषयांवर बोलायला खूप आवडते. विद्रोहाची सवयच लागलीये जणू. आता तुम्ही दशकपूर्ती नेमकी कशाची झाली याचा विचार करत असाल ना? माझ्या आजीच्या भाषेत सांगायचं झालं तर, “मी शहाणी झाले किंवा मला पहिल्यांदा कावळा शिवला.” याला तब्बल दहा वर्षं पूर्ण झालीत आणि अकराव्या वर्षांत पदार्पण केलंय मी. बऱ्याच दिवसांपासून या अतिशय संवेदशील पण तितक्याच हलक्या-फुलक्या विषयावर लिहायचं होतं. आज पेन हातात घेतला. मला अजूनही तो दिवस आठवतो. मी माझ्या बाबांसोबत शाळेत पाचवी इयत्तेमध्ये प्रवेश घ्यायला निघाले होते आणि तेवढयात ही गोष्ट कपडे धुताना आमच्या कामवालीच्या लक्षात आली. आई नोकरीवर गेलेली. घरात होत्या फक्त माझी आजी आणि मावसबहीण रूपाताई. ताईने मला विचारले, “तुझ्या पोटात दुखतंय का?” नक्की झालंय काय? मला काहीच कळत नव्हते नक्की झालय काय. किती लहान वय ते... खेळण्या-बागडण्याचं. पण ह्या एका घटनेने आयुष्यच बदलून गेलं. मासिक पाळीचा अर्थही कळत नव्हता. परंतु दर महिन्याला मला काहीतरी होतंय याचा न्यूनगंड मनात छळ माजवत होता. त्यावेळी त्या पार्वतीची गोष्ट ऐकल्यावर मला तिचा खूप रा...