बेगम जान


     एक महिन्यापुर्वी एक जबरदस्त ट्रेलर पाहीला. विद्या बालन माझी सगळ्यात आवडती अभिनेञी, तिच्या नंतर स्मिता पाटील यांचा नंबर. त्यामूळे बेगम जानची उत्सुकता फार लागली होती. अखेर काल हा चिञपट पाहीलाच.डोकं सुन्न झालं होतं, अनेक प्रश्नांनी मनात थैमान घातले होते. विद्याचा अप्रतिम अभिनय सोबत चपराक संवाद असा हा चिञपट मला खूप आवडला.
    वेश्या व्यवसाय करणारा व्यवसायिक महीलांची ही कहाणी. बेगम जान त्यांची मुखिया. Radcliffe च्या "Partition Line" मूळे त्यांना त्यांचा कोठा सोडावा लागणार होता. पण या बायकांना हे मंजूर नव्हते. त्या लढल्या, पडल्या, कोसळल्या,रडल्या,भाजल्या,मेल्या... पण हारल्या नाहीत. *"Lived as whores, fought as Queens"*
बेगम जानच्या कोठ्यात येणारी प्रत्येक मुलगी अनेक कडू आठवणी सोबत घेऊन आली. स्वत: बेगम जान ही बाल विधवा होती. कोणी बलात्कार पिढीत तर कोणी फाळणीची बळी. पुर्वआयुष्यातील ओरखडे विसरून या महीला बिनधास्त आयुष्य जगत होत्या. ना कशाची भिती ना इज्जतीची काळजी. त्यातील एकीला एक पुरूष आवडला होता तर एका पुरुषाला त्यातील एक आवडली होती. लेसबीयन्सची जोडी ही होती त्यात.
    बेगम जान बेधडक, धाडसी, आयुष्यात अनेक धक्के सोसलेली शूर विरांगणाच जणु. ती बोलते *"बाप, भाई, बेटा, शौहर...बेगम जान की चौकट के उस पार हर मर्द मुर्गा होता है, तिन टांगोवाला मुर्गा"* यातूनच तिची पुरूषाबद्दलची भूमिका स्पष्ट होते. परिस्थितीने तिला एवढे कणखर बनविले होते.15 आँगस्टला स्वातंञ्य मिळाले पण याचे तिला काहीच अप्रुफ नव्हते कारण ती म्हणते *"तवाईफ के लिए हर दिन एक जैसा होता है, एक बार बत्ती बूझी, तो सब एक"* ती तिचे नियम पाळते. तिला कोणाच्या धर्माशी किंवा कर्माशी काही घेण-देण नाही. वेश्येला जात असते का म्हणा. बेगम जानचा कोठा धर्मनिरपेक्षतेचे उत्तम उदारहण देऊन जातो.
    सरकारी आँफिसर जेव्हा तिला एक महीन्यात कोठा खाली करण्याची नोटीस देतात त्यावर बेगम जान कडाडते "महीना हमें गिनना आता है साब, हर बार साला लाल करके जाता है" अंगावर शहारे आणणारे हे शब्द तिच्या हिमत्तीची दाद आहेत.ज्या मुलींना तिने सांभाळले, आश्रय दिला, प्रेम केले त्यातील एक जेव्हा गैरसमजाने स्वार्थासाठी बोलते *"कसाई की दुकान में बकरे को प्यार से घास खिलाना सिर्फ घास खिलाना होता है, प्यार नहीं"* त्यावेळी जिद्दी बेगम जान कोलमडून जाते.
    मग सुरू होते जंग.ज्यात हारणे हे बेगम जानला मंजूर नसते.मरण आले तर ते स्वत:च्या घरात मनाने यावे असे तिला वाटते. ती व तिच्या सहकारी रणरागिनी लढतात अगदी शेवट पर्यत हार न मानता. अखेर राणी पद्मावती सारख्या आगेत विलीन होतात. बस... हा आहे शेवट बेगम जानच्या कथेचा. सुरूवातीचा आणि शेवटचा शाँट स्वत: चिञपटातच पहा.
    तुमच्यासाठी एक वेश्या म्हणजे शरीर, लाज गहान ठेवलेली चारीञ्यहिन स्ञी. पण माझ्यासाठी ती एक व्यवसायिक आहे. इतरांसारखीच एक व्यवसायिक जी ग्राहकांना सेवा प्रदान करते. तिची नेहमीच नाईट शिफ्ट असते.त्यातून तिला पैसे मिळतात व ती तिचा आणि कुटुंबाचा उदरर्निवाह करते. ती याच व्यवसायात का आली तर प्रत्येकीची आपआपली एक गोष्ट आहे. काही परिस्थितीमुळे आल्या तर काही पिढीजात व्यवसाय आहे म्हणून, काही नाईलाजाने तर काही विश्वासघातामुळे. त्यांनी त्यांचे हे जीवन स्वीकारलय. स्वत:ला निर्लज देहाखाली रगडून घ्यायचे हेच तिचे ब्रीद. हा जगण्याचा मार्ग तिला कोठे नेऊन सोडेल याची तिलाही कल्पना नाही.  तिला या व्यवसायातून बाहेर पडून दुसरे काही काम करायचे, शिकायचे असेल तर तिच्या पुणर्वसनासाठी आपण मदत केलीच पाहीजे. पण हा व्यवसाय कायमचा बंद होईल अशी पोकळ आशा कशासाठी ठेवायची?
    वेश्या व्यवसायाला ऐतिहासिक वारसा आहे आणि तो युनिव्हरसल ही आले.अर्थशास्ञाचा नियम आहे *"Demand creates it's supply".* जगात सगळीकडेच हा व्यवसाय दिसून येतो. म्हणुन स्ञीने यात यावे असे माझे म्हणणे नाही. पण जे आपण रोखू शकत नाही त्याबद्दल फुकटा आदर्शवाद का घ्यावा?
    मी म्हणते का आपण एका वेश्या व्यवसायिकेला समाजात स्विकारत नाही? त्याही या समाजाच्या घटक आहेत ज्या पुर्वीपासून उपेक्षित राहील्यात. वेश्या वस्तीला गरज आहे ती प्रबोधनाची. आरोग्य, स्वच्छता, शिक्षणाच्या प्रबोधनाची. मला त्यांचे सबलीकरण फार महत्त्वाचे वाटते. ज्या महिला या दलदलीतून बाहेर पडू पाहतायत त्यांना त्यांस मदत करणे, उपजिवीकेचे साधन मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. एक माणूस म्हणून त्यांचा स्वीकार करणे हे आपले कर्तव्यच आहे. त्या आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. वासनेच्या आहारी गेलेल्या नराला त्या सामोरे जातात, कदाचित म्हणून आम्ही आज ताठ मानेने जगू शकतो. वेश्या व्यवसाय बंद केला तर बलात्काराचे प्रमाण वाढेल हे सत्य नाकारून चालणार नाही.
    बेगम जान मधील गुलाबों म्हणते "जिस्म की ही नहीं, सड्डे दिल की भी कोई किमत होती है" तिला तिचा आत्मसम्मान आहे. *She deserves to be loved.* तिला सहानुभूतीची नाही तर समान वागणूकीची गरज आहे. तिच्यावर बोटे मोडणारे खूप भेटतील पण तिचा हात सामावून घेणारा कोणी असेल का? असंख्य निरोत्तरीत प्रश्न आहेत, यांची उत्तरे शोधणे म्हणजेच जीवन.
    अशा माझ्या तमाम व्यवसायिक बहिणींना एक ग्राँड सेल्यूट. या उपेक्षीतांसाठी मी माझ्यापरीने जमेल तसे काम करेनच, तुम्हीही नक्की करा.
         
                      - समता हेमा अनिल जगताप

Comments

  1. Another great topic you've chosen.
    Prostititution itself is not a commendable act.
    And people who take up this horrible lifestyle are there because mostly they have no choice. And people desecrate the whores for this heinous act, they treat these women like shit but they won't say a word about the person who is paying for it, the one who is responsible for keeping them in this profession.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दशकपूर्ती निमित्ताने.....

नात्यातील कोडी उलगडताना.....