संविधानात प्रस्तुत केलेल्या स्वातंञ्याचा आधार घेऊन आम्ही आमच्या घरी आमच्या इच्छेखातर बाय चॉईस गणपती बसवतो. गणपती बसवल्यावर पुजा आर्चा, सत्यनारायण ही करावा, त्यामुळे घरात सुख शांती नांदते. पुजेसाठी आम्हाला भट लागतो. ज्या व्यवस्थेने आम्हांला माणसा सारखी वागणूक दिली नाही, आमचे अस्तित्वच नाकारले त्या व्यवस्थेला मूठमाती देण्यापेक्षा ती व्यवस्था शाबूत ठेवण्यात आमचा खारीचा वाटा आहे.
    प्रबोधनाचा उत्तम मार्ग असताना, हिंसा व बहिष्कृत करण्याची भाषा वापरणारे आम्ही धम्माचे उपासक आहोत.
   आम्ही धर्म बदलला पण कर्मकांड सोडले नाहीत. नावे वेगळी, प्रथा वेगळ्या परंतु व्यवस्था तीच निर्माण करतोय. आमच्याकडेही आम्ही "दलाल" आणलेत.
    आम्ही तर्कवादी व पुरोगामी धम्माचे आचरण करत आहोत.

                                          - सजग 

Comments

Popular posts from this blog

दशकपूर्ती निमित्ताने.....

बेगम जान

नात्यातील कोडी उलगडताना.....