दशकपूर्ती निमित्ताने.....
मला taboo विषयांवर बोलायला खूप आवडते. विद्रोहाची सवयच लागलीये जणू. आता तुम्ही दशकपूर्ती नेमकी कशाची झाली याचा विचार करत असाल ना? माझ्या आजीच्या भाषेत सांगायचं झालं तर, “मी शहाणी झाले किंवा मला पहिल्यांदा कावळा शिवला.” याला तब्बल दहा वर्षं पूर्ण झालीत आणि अकराव्या वर्षांत पदार्पण केलंय मी.
बऱ्याच दिवसांपासून या अतिशय संवेदशील पण तितक्याच हलक्या-फुलक्या विषयावर लिहायचं होतं. आज पेन हातात घेतला.
मला अजूनही तो दिवस आठवतो. मी माझ्या बाबांसोबत शाळेत पाचवी इयत्तेमध्ये प्रवेश घ्यायला निघाले होते आणि तेवढयात ही गोष्ट कपडे धुताना आमच्या कामवालीच्या लक्षात आली. आई नोकरीवर गेलेली. घरात होत्या फक्त माझी आजी आणि मावसबहीण रूपाताई. ताईने मला विचारले, “तुझ्या पोटात दुखतंय का?” नक्की झालंय काय? मला काहीच कळत नव्हते नक्की झालय काय.
किती लहान वय ते... खेळण्या-बागडण्याचं. पण ह्या एका घटनेने आयुष्यच बदलून गेलं. मासिक पाळीचा अर्थही कळत नव्हता. परंतु दर महिन्याला मला काहीतरी होतंय याचा न्यूनगंड मनात छळ माजवत होता. त्यावेळी त्या पार्वतीची गोष्ट ऐकल्यावर मला तिचा खूप राग यायचा. बिनकामाचा आमच्या डोक्याला त्रास दिला म्हणून. थोडी मोठी झाल्यावर याची सवयच लागून गेली होती. माझ्या मैत्रिणींना हे असलं काही अजून सुरु झालं नाहीये म्हणून मी त्यांना लकी वगैरे समजत होते. ’पाळी’ नावाच्या राक्षसीणीने माझे दार एवढया लवकर का ठोठावले? काय माहित? असो. नैसर्गिक क्रिया ती, तिला आपण काय करणार?
दिवसांमागून दिवस सरत गेले. कॅलेंडरची पानं बदलत गेली. विज्ञान विषयांत ‘Menstrual Cycle’ बद्दल बरीच माहिती मिळाली. अनेक गैरसमज दूर झाले. पाळीही नंतर लपाछपी खेळू लागली. Harmonal Imbalance, Irregular Periods, Increasing Weight ह्या सगळ्यांनी घेरलंच ना मला राव. कशाचं काय.... वैताग नुसता. अजूनही गाडी अशीच चालू आहे. कधी कधी तर मला मूल होईल की नाही, याची शंकाच येते.
Periods चे पाच दिवस म्हणजे भयानक अंधारच जणू. कधी कधी वाटतं ‘बाईपण नको गा निसर्गा’. पण त्याच वेळी स्वत:च्या शक्तीची जाणीव होते. स्त्री मध्ये तेवढे सामर्थ्य म्हणून तिला मातृत्वाचे वरदान लाभले आहे. पाळी ही मातृत्वाची किल्ली ! आली काय आणि गेली काय. एकदा आईला मी म्हंटलं, “पाळीचं जास्त टेंशन नाही घ्यायचं. असंही मी बाळ दत्तक घेणारे. So मला त्याचा फारसा काही उपयोग नाही.” आईने कपाळावरच हात मारून घेतला. माझ्याडॉक्टर बहिणीशी बोलल्यावर समजले की असे काही नसते. मासिक पाळीला एवढे casually घेऊ नकोस. खरंच असं नाही केले पाहिजे पण लहानपणापासून माझ्या मनात त्याबद्दल इतकी चीड होती, म्हणून होत असेल कदाचित.
पण पाळी मला माझे सामर्थ्य दाखवून देते. माझ्यातील सहनशीलतेशी माझी ओळख करून देते. शेवटी एवढेच म्हणेन "I'm Happy to Bleed".
मागच्या वर्षी मी कॉलेजच्या ‘शिवविजय’ नियतकालिकेसाठी ‘Happy to Bleed’ नावाचा लेख लिहिला होता. बऱ्याच जणांना पचला नव्हता तो.
भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक असलेल्या एका मंदिराचा मुख्य पुजारी बोलतो की, “आजकाल शरीर तपासायची मशीन्स उपलब्ध आहेत. पण जेव्हा बायकांना मासिक पाळी चालू आहे की नाही हे तपासायची मशीन उपलब्ध होईल तेव्हा आम्ही त्यांना मंदीरात प्रवेश देवू.” कोण कुठला माईका लाल ? आख्या स्त्री वर्गाला ‘दूषित’ समजतो ? भयंकर चीड आली होती तेव्हा मला. या शहाण्याला तोडीस तोड उत्तर पटियालाच्या एका तरुणीने पत्राद्वारे दिले. मग ‘Happy to Bleed’ ही मोहीम सोशल मिडिया वर सुरु झाली. कमी कालावधीत त्याला खूप प्रसिद्धीही मिळाली आणि प्रतिसादही. अनेक मुला-मुलींनी आपल्या हातात Charts, Sanitary Napkins घेऊन त्यावर ‘Happy to Bleed’ असं घोषवाक्य लिहिलं होतं.
मासिक पाळीबद्दल अजूनही खूप गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. पाळी सुरु असताना देवघरात जायचे नाही, पूजा करायची नाही, स्वयंपाक करायचा नाही, पाण्यात जायचे नाही असे एक ना अनेक. कितीतरी मंदिरांमध्ये यासंबंधीचे बोर्ड लावलेले असतात. भारतामध्ये अशीही काही मंदिरे आहेत जिथे प्रजनन वयातील महिलांना प्रवेश नाहीये. किती भयानक आहे हे सगळं !
आपण २१व्या शतकात जगतोय पण अजूनही अनेक स्त्रिया या असल्या बिनबुडाच्या अंधश्रद्धांना कवटाळून आहेत. माझ्या खूप मैत्रिणी अगदी डॉक्टर असलेल्या सुद्धा हे so called rules अजूनही पाळतात. अरे का ? कशासाठी ? मासिक पाळी ही किती मोठी भेट आहे तुमच्यासाठी. तुमचे सामर्थ्य आहे ते. मग ती गोष्ट तुम्हाला अपवित्र कशी काय ठरवु शकते ?
पूर्वीच्या काळी हे नियम बनवले असतील तर त्याची कारणे वेगळी असू शकतात. स्त्री सतत कामात असते आणि पाळीच्या पाच दिवसांत तिला त्रासही होत असतो. अशा वेळी तिला आराम मिळावा म्हणून कदाचित स्वयंपाक करायला नको यासाठी तिला एकटीला वेगळं ठेवा, तिला थोडा आराम मिळू द्या, असा हेतू असूही शकतो. (खरं काय ते मला माहित नाही) पण आपण आता या गोष्टींचा फार अतिरेक करतोय असे वाटत नाही का?
लोक स्त्रीच्या ओठांवर, गालांवर, पायांवर, मांडयांवर, दिसण्यावर भाळतात. मग याच स्त्रीला एक ‘Bleeding Vagina’ म्हणजेच ‘रक्तयुक्त योनी’ देखील आहे ज्यामुळे हे जग सुरु राहणारे,हे का स्वीकारत नाहीत लोक ? मासिक पाळी ही साधी नैसर्गिक क्रिया आहे. ती कोणालाही पवित्र/अपवित्र ठरवत नाही. स्त्री तिच्या बाळाला नऊ महिने गर्भाशयात वाढवते. त्याला पोषण देते. मंदिरात प्रवेश करणारा प्रत्येक पुरुष हा त्याच्या आईच्या गर्भाशयातील रक्तातच वाढला ना ? मग तो अपवित्र कसा काय नाही झाला ? ही मक्तेदारी काय फक्त बायकांचीच का ? अरे कधी कळणार तुम्हाला गाढवांनो...???
खरं तर अंधश्रद्धेची खरी वाहक स्त्रीच जास्त असते. याबाबतही स्त्रीच प्रमुख आहे. तिला कधी कळणार आणि कसं समजणार अपवित्र वगैरे काही नसते. पाळीला naturally स्वीकार आणि बिनधास्त जीवन जग. नको ते नियम पाळूस.
भारतात मासिक पाळी हा विषय खूप भयानक आहे. मुलीला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची पूजा वगैरे करतात. अरे काय हा फालतूपणा ? त्या पोरीच्या मनाचा विचार करा जरा. काय वाटत असेल तिला ? इथे Sanitary Napkin आणायचे असेल तर महिला कर्मचारी असलेले मेडिकल शोधावे लागते. वापरलेले pad काळ्या plastic पिशवीत घेऊन टाकावे लागते. तसेच Spotting झालंय का पाहायला हजारदा मैत्रीणींना सांगावे लागते.
कधी बाहेर येणार यातून आपण ? स्त्रीला तिचं सामर्थ्य कधी कळणार ? कधी ती या अंधश्रद्धांना मूठमाती घालणार ? कधीतरी हे नक्की होईल. आता काही प्रमाणात होतंयही. आपण आशावादी राहूया.
मी पुरोगामी कुटुंबात वाढले त्यामुळे हे असले नियम मी कधीच पाळत नाही. अनेकदा पाळी सुरु असताना मी मंदिरांमध्ये प्रवेश केलाय. (मंदिर पाहण्यासाठी हं फक्त :) ) अजून तरी मला काहीही झाले नाहीये. मी बिनधास्तपणे मेडिकलमध्ये जाऊन Sanitary Pads मागते. त्यात variety असेल तर ते ही पाहते. (स्त्री गुण.....दुसरं काय :P ) T.V. वर Sanitary Pads च्या जाहिराती मुद्दाम सगळ्यांसमोर पाहते. माझ्या भावाला त्याबद्दलची माहिती देते. हे सगळं करण्यात मला कसलीही लाज वाटत नाही.
माझ्यासारखा विचार माझ्या बाकीच्या भारतीय बहिणी कधी करणार ? कधी झुगारून देणार ही बंधने ? उठा गं माझ्या सावित्रीच्या लेकींनो, जाग्या व्हा, बंड करा. परंपरा, संस्कृती सगळे शून्य आहे. स्वत:चं अस्तित्व निर्माण करा. हा बदल नक्की घडेल. परिवर्तनाची लाट येतीये. आपण आशावादी राहूया. शेवटी एवढेच म्हणेन,
“हम होंगे कामयाब एक दिन,
मन में हैं विश्वास, पुरा हैं विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन”
*- समता हेमा अनिल जगताप*
Samata you have portrayed your mind its a great thing but I would not agree with you for the thought of culture and traditions..they must be carried on and passed to the next generation wit scientific attitude.. being on menstrual period is not considered to be impurity tats rightly mentioned but you must take care of your health .
ReplyDeleteअनेकदा पाळी सुरु असताना मी मंदिरांमध्ये प्रवेश केलाय. (मंदिर पाहण्यासाठी हं फक्त :) this in bracket says that you contradict wat you say
on the contrary I believe visiting temple and offering prayers give you optimism in any health conditions.
I've more on this we'll surely meet and discuss
Samata you have portrayed your mind its a great thing but I would not agree with you for the thought of culture and traditions..they must be carried on and passed to the next generation wit scientific attitude.. being on menstrual period is not considered to be impurity tats rightly mentioned but you must take care of your health .
ReplyDeleteअनेकदा पाळी सुरु असताना मी मंदिरांमध्ये प्रवेश केलाय. (मंदिर पाहण्यासाठी हं फक्त :) this in bracket says that you contradict wat you say
on the contrary I believe visiting temple and offering prayers give you optimism in any health conditions.
I've more on this we'll surely meet and discuss
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteगंभीर विषय व स्री विषयक शाररीक शिक्षण आणि काही प्रमाणात भावनिक विषय आपण छान पद्धतीने मांडला आहे.विशेष कौतुक की इतर कुणाविषयी न सांगता स्वानुभव कथन केल्यानं हे लेखन आणखीन जवळच आणि विश्वासार्ह वाटते त्याची परिणाम कारकता जास्त जाणवते
ReplyDeleteलेखात म्हटल्या प्रमाणे या गोष्ठीला बदला साठी महिला चाच विरोध आहे.हा विरोध कश्या मुळ आला आणि याची मुळ तोडण्या साठी शिक्षण हे माध्यम प्रभावी आहे .हे जे अनिष्ठ रुढीच कवच आहे ते भेदण्याच काम या लेखातून होत आहे.स्त्री ला या तुन बाहेर पडायचं नाही असे नाही पण हे त्यांच्या पर्यंत पोहचल पाहिजे. तुम्ही पुरोगामी कुटुंबातील जन्माने आहात तो तुमचा जमेचा भाग आहे.
या कालावधीत मुद्दाम मंदिरात जाणे देव्हार्यात जाणे म्हणजे ठरवून केलेली कृती झाली,.मूळ होणारा त्रास आणि सार्वजनिक मानसिकता बदल होणे प्राथमिकता आहे.स्त्री ला हवी ती विश्रांती ,मानसिक आधार आणि यातील नैसर्गिकता आपली वाटली पाहिजे.
त्यासाठीचा आपण करत असलेला हा छान प्रयत्न आहे.
लिहीत रहा...
खूप छान मॅडम
ReplyDeleteHello Samata.. I wholeheartedly appreciate your rebellion against evil traditions. Your boldness is commendable and more commendable is the cause for which you are becoming bold. Proud of you.
ReplyDeleteYou have written this article so beautifully. And as for the topic of this article, you have chosen a great issue which is one of the most important problems a woman faces, especially in our country but is a "taboo" to even utter a word about it.
ReplyDeleteI loved it.
Reading about how stupid people are about this, is both sad and quite entertaining to be honest.
People need to learn to keep an open mind about this.
Great article. Thanks for sharing.
हे सगळं आम्हा मुलींना पटतंय, आणि पचतंय सुद्धा. पण जे जुन्या विचारांचे लोक आहेत, त्यांचं काय?? But I would like to tell you that " i am happy to bleed."....🙂🙂
ReplyDelete