नात्यातील कोडी उलगडताना.....

              माणूस हा नात्यांमध्ये गुरफटलेला सामाजिक प्राणी. नाती किती महत्वाची असतात ना? विविध नात्यांचं मोलाचं स्थान असते आपल्या आयुष्यात. आई, बाबा, आजी, आजोबा, काका ,मामा, मावशी, आत्या हि नाती जन्मानेच मिळतात. पण मैत्रीचं नातं बनवावे लागते. हीच या नात्याची खासियत आहे.
             मैत्री म्हणजे निखळ आनंद. कधीही, कोठेही, कोणाशीही, कशीही मैत्री होते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसहित स्वीकारणे म्हणजे मैत्री. ज्यात कसलेही बंधन नाही ती झाली मैत्री. "तू जैसी भी है, तू मेरी दोस्त है" हे असे काहीसे असते यात. रखरखत्या उन्हात मंद हवेची हळुवार झुळूकच जणू. मैत्री बरेच काही शिकवते, अनेक अनुभव देते. या सुंदर नात्यातील वीण उसवायला लागली तर............
             या सारखा दुसरा कुठला आघात नाही.गैरसमज,अबोला, संवादाची कमतरता, नवीन लोकांचा समावेश, जुन्या लोकांची घुसखोरी,वैचारिक मतभेद,वैयक्तिक मतभेद,ताण तणाव, इ. करणे जबाबदार असू शकतात या आघातासाठी.खरं कारण कुठले हे आपले आपण शोधून काढावे. पण खरंच त्याचा काही उपयोग आहे का?
             दुरावलेला माणूस पुन्हा येणार आहे का? आपल्यासाठी ती व्यक्ती लाख मोलाची असेल, पण तिच्यासाठी आपण तसे असूच असे नाही ना. कदाचित आपण त्या व्यक्तीसाठी एक पर्याय हि असू शकतो. जवळची माणसेच जास्त दुःख देतात हे खरंय. अनपेक्षित व्यक्तीकडून असे घडले तर त्या सारखे वाईट काहीच नाही,असे वाटते.
             खरं सांगायचे तर, मैत्रीच्या दुनियेत आपली म्हणण्याजोगी फार कमी माणसे राहिलीयेत माझ्या आयुष्यात. एका कोळी सारखी अवस्था झालीये.स्वतःच तयार केलेल्या नात्यांच्या जाळ्यात मी पुरती अडकलीये. लोक मला नेहमी म्हणतात "तुझा विचार ना करणाऱ्यांचाहि तू फार विचार करतेस". साला स्वभाव नडतो ना आपला. मला माणसे कमवायला आवडतात, गमवायला नाही.
            नातं म्हणजे एक कोडंच आहे जणू....कधीही न सुटणार. माणसे आणि त्यांची मने जपत राहायचे. समोरचा व्यक्ती असे करेलच असे नाही ना. अपेक्षा ठेवणे चूक आहे आणि ती चुकीच्या माणसांकडून ठेवणे तर महाचूक आहे. पण चुकतो तो माणूसच ना शेवटी, मी थोडीच अपवाद आहे त्याला.
            एवढे होऊनही ती व्यक्ती अशी वागली याचे कारण "परिस्तिथी" असे समजत राहिले माझे भाबडे मन. नंतर उमगले कि हे असे काहीच नाही.ती तर निवांत आनंदात जगत होती.मग काय दोष माझा? नात्यातील डावपेच हळू हळू शिकतीये.खेळाचं आहे हा सगळा...भावनांच्या कवड्यांच्या.नाती हि क्षणभंगुर. नात्यातील कोडी उलगडताना त्रास होतोय खरं, पण हे दिवस हि सरणार आहेत. निघाले मी नवीन माणसांच्या शोधात, त्याच आपुलकी आणि मायेने. पाहू अजून किती वाटाड्ये भेटतायत.
                                                                                                        

                                                                                                                    - सजग

Comments

  1. Friendship is the one of the most sacred, loving, and necessary relationship we become part of in our life. But more often it is looked down upon. People have lost the meaning of true friendship. They think it is just a stepping stone or the initial phase to get into more serious relationships.

    And I agree with you, thinking about people or rather pondering over the things they've said or done to you is a nightmare which I still can't get out of.

    It is excruciating to learn that you meant nothing to a person who, at one moment meant so much to you.

    Well written.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दशकपूर्ती निमित्ताने.....

बेगम जान